बातम्या

तुम्ही आता कर्तारपूरमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकता 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीः शीख धर्मियांमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कर्तारपूर येथील दरबारसिंग गुरूद्वारा येथे भारतीय भाविकांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी सहमती झाली. मात्र, या बैठकीमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यावर एकमत होऊ शकले नाही.

अमृतसर जिल्ह्यातील अट्टारी येथे बुधवारी दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. त्या वेळी भाविकांना प्रवेश देण्यासाठी शुल्क लावण्याचा पाकिस्तानचा आग्रह होता, तर भारताने त्याला आक्षेप घेतला; तसेच गुरूद्वाराच्या आवारामध्ये भारतीय राजनैतिक किंवा राजशिष्टाचार अधिकारी असावा, असे भारताचे म्हणणे आहे, तर पाकिस्तानचा त्याला विरोध आहे. पाकिस्तानने त्यांच्या या भूमिकेचा फेरविचार करावा, असे आवाहन भारतीय अधिकाऱ्यांनी केले. या बैठकीमध्ये कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात यश आले नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास यांनी सांगितले.पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असणाऱ्या कर्तारपूर येथील गुरूद्वाऱ्याचे शीख धर्मियांमध्ये अतिशय महत्त्व आहे. गुरूदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकपासून चार किलोमीटरवर असणाऱ्या या गुरुद्वाऱ्यामध्ये शीख भाविकांना प्रवेश देण्याविषयी अनेक वर्षांपासून चर्चा होत होती. पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव दिल्यानंतर दोन्ही बाजूंकडून त्यावर चर्चा सुरू झाली. 

पाकिस्तानच्या बाजूने पुलाचे काम अपूर्ण आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाचे संचालक (दक्षिण आशिया व सार्क) महंमद फैझल यांच्या नेतृत्वाखाली १५ सदस्य सहभागी झाले होते.कॉरिडॉरविषयी दोन्ही देशांमधील ही तिसरी चर्चा आहे, तर केंद्र सरकारने ३७०वे कलम हटविल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असताना झालेली ही दुसरी बैठक आहे.
रावी नदीवर पूल बांधण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दाखविली आहे

सातही दिवस सुरू

पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या सुविधांवर ही संख्या निश्चित होणार आहे. आठवड्यातील सातही दिवस हा कॉरिडॉर सुरू राहणार असून, गटाने किंवा वैयक्तिकरीत्या या गुरूद्वाऱ्याला भेट देण्याची मुभा भाविकांना असेल.
 भारतीय भाविकांना या गुरूद्वाऱ्यापर्यंत व्हिसा न घेताही प्रवेश देण्याला दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. त्यामध्ये अनिवासी भारतीयांचाही समावेश आहे. दररोज ५००० भाविक या गुरूद्वाऱ्याला भेट देऊ शकतील; तसेच विशेष दिवसांमध्ये ही संख्या वाढू शकते. 

Web Title access to kartarpur without a visa

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

Girish Mahajan News : त्यानंतरच खडसेंनी भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT